खडसेंचा फडणवीसांना मेसेज : ‘एकदा आपण बसू अन् मिटवून टाकू’; महाजनांनी केला उघड

मुंबई तक

• 03:37 AM • 03 Oct 2022

जळगाव : एकनाथ खडसे यांनी मला आणि देवेंद्र फडणवीसांना एकत्र बसून मिटवून टाकू, असे म्हटल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजप नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला. ते जळगावमध्ये बोलत होते. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार असलेल्या खडसे यांना भाजपमध्ये परतीचे वेध लागले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील […]

Mumbaitak
follow google news

जळगाव : एकनाथ खडसे यांनी मला आणि देवेंद्र फडणवीसांना एकत्र बसून मिटवून टाकू, असे म्हटल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजप नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला. ते जळगावमध्ये बोलत होते. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार असलेल्या खडसे यांना भाजपमध्ये परतीचे वेध लागले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी नाशिकमधील अखिल भारतीय महानुभाव संमेलन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे एकाच मंचावर आले होते. परंतु कार्यक्रमात खडसे भाजप पदाधिकाऱ्यांपासून लांब बसल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगितलं होतं. यामुळे नेमके खडसे यांनी फडणवीस यांच्या कानात काय सांगितलं असेल? याबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या.

अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः खडसे काय बोलले होते याबद्दल खुलासा केला आहे. महाजन म्हणाले, भाषण झाल्यावर खडसे माझ्याजवळ आले आणि म्हणाले की एकदा आपण बसू, मिटवून टाका, जाऊद्या. त्यावर पत्रकारांनी खडसे यांना नेमकं काय मिटवायचं आहे असा सवाल महाजन यांना केला. तेव्हा महाजन म्हणाले, त्यांचं सध्या जे काय चाललंय त्यावरून त्यांचं काय मिटवायचं होतं ते गर्दी आणि गोंधळामुळे विचारता आलं नाही. पण आता बसल्यावर त्यांच्या मनात काय मिटवायचं आहे ते माहित नाही.

‘तुम्ही तुमची काळजी घ्या आमची काळजी करू नका’

मंत्रिमंडळ विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी शिंदे सरकार कोसळेल असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. या वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, तुम्ही तुमची काळजी घ्या आमची काळजी करू नका. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. सरकार चांगलं काम करत आहे, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

    follow whatsapp