महाराष्ट्राचा स्वाभिमानी यशवंत विचार दिल्लीपुढे झुकला नाही; झुकणार नाही -सुप्रिया सुळे

मुंबई तक

• 04:28 PM • 18 Oct 2021

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होऊन आता दोन वर्षे झाली आहेत. शरद पवारांचं ऐतिहासिक भाषण ज्यावेळी वरूणराजाने हजेरी लावली होती आणि ज्या भाषणाने निवडणुकीची भाकरी फिरवली त्या भाषणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने आज सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं आहे. हाच तो क्षण हिच ती वेळ.. असं म्हणत त्यांनी हे ट्विट केलं आहे. हाच […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होऊन आता दोन वर्षे झाली आहेत. शरद पवारांचं ऐतिहासिक भाषण ज्यावेळी वरूणराजाने हजेरी लावली होती आणि ज्या भाषणाने निवडणुकीची भाकरी फिरवली त्या भाषणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने आज सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं आहे. हाच तो क्षण हिच ती वेळ.. असं म्हणत त्यांनी हे ट्विट केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

हाच तो क्षण, हिच ती वेळ…

आज बरोबर दोन वर्षे झाली, जेंव्हा पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ‘महाराष्ट्राचा स्वाभिमानी यशवंत विचार कधीही दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही.’

शरद पवार Vs बाळासाहेब विखे पाटील घराण्याच्या संघर्षाचा इतिहास

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले साताऱ्याचे तत्कालीन लोकसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. ‘चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली’ असं शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केलं. तसंच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे, असं सांगत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं होतं.

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीतही त्यांनी पाऊस कोसळत असताना भाषण सुरु ठेवलं. ऐंशी वर्षांच्या योद्ध्यावर फक्त राष्ट्रवादी समर्थकांनीच स्तुतिसुमनं उधळली, अशातील भाग नाही, तर भाजप वगळता इतर पक्षातील दिग्गज नेते, सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर कौतुक केलं.

विशेष म्हणजे शरद पवारांचं आवाहन साताऱ्यातील जनतेने मनावर घेतलं. भाजपच्या तिकीटावर लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उदयनराजेंना दणदणीत पराभव झाला. तर श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले. हा पराभव उदयनराजेंच्याही जिव्हारी लागला होता. भाजपने यथावकाश त्यांचं राज्यसभेवर पुनर्वसन केलं. मात्र भर पावसातील शरद पवारांची ऐतिहासिक सभा उदयनराजे आणि भाजपला मोठी जखम देऊन गेली.

एवढंच नाही तर शरद पवार यांच्या भाषणाने महाराष्ट्रात भाकरी फिरवण्याचं काम केलं. 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान पार पडलं. त्यानंतर राज्यात निकाल लागल्यानंतर जो निकाल आला तो खरंतर महायुतीच्या बाजूने होता. मात्र पुढे महिनाभर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून भांडण झालं, पुढे ते भांडण विकोपाला जाऊन त्यांची युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्याचे शिल्पकार ठरले ते शरद पवार आणि संजय राऊत. या सगळ्याची सुरूवात पावसातल्या भाषणातून झाली. आज सुप्रिया सुळेंनी ती आठवण पुन्हा जागवली आहे.

    follow whatsapp