‘प्रचंड!’ आता आला पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर..

मुंबई तक

01 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:48 AM)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर आता आला आहे. प्रचंड विश्वास.. प्रचंड साहस, प्रचंड परंपरा सावरगाव दसरा मेळावा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी यांनी हा टिझर ट्विट केला आहे. या टिझरमध्ये पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. पंकजा मुंडे गेल्या काही वर्षांपासून सावरगाव या ठिकाणी दसरा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर आता आला आहे. प्रचंड विश्वास.. प्रचंड साहस, प्रचंड परंपरा सावरगाव दसरा मेळावा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी यांनी हा टिझर ट्विट केला आहे. या टिझरमध्ये पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. पंकजा मुंडे गेल्या काही वर्षांपासून सावरगाव या ठिकाणी दसरा मेळावा आयोजित करतात. कोरोनाच्या काळात या परंपरेत खंड पडला होता. आता यावर्षी पुन्हा जोषात आणि उत्साहात दसरा मेळावा साजरा होतो आहे.

हे वाचलं का?

राज्यात दोन दसरा मेळाव्यांची चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांचा मेळावा

महाराष्ट्रात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. एक मेळावा आहे उद्धव ठाकरेंचा तर दुसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणार आहे. एक शिवतीर्थावर तर दुसरा बीकेसी मैदानावर होणार आहे. राज्यात या दोन दसरा मेळाव्यांची चर्चा जोरात रंगली आहे. त्यात आता पंकजा मुंडे यांनी सावरगाव या ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्याचा टिझर ट्विट केला आहे.

कोरोनाच्या निर्बंधानंतरचा पहिलाच मेळावा

सुरूवातीचे अनेक वर्षे भगवानगडावर हा मेळावा आयोजित करण्यात येत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून मेळाव्याचं ठिकाण बदललं आहे. सुपे सावरगाव या ठिकाणी दसरा मेळावा गेल्या काही वर्षांपासून भरवण्यात येतो आहे. या मेळाव्यात नागरिक राज्यभरातून आणि परराज्यातूनही येत असतात. पंकजा मुंडे यांचं प्रमुख भाषण दरवर्षी होतं. तसंच इतर राजकीय नेत्यांचीही भाषणंही होतात. गेल्या वर्षी कोरोना असल्याने मोजाक्या लोकांनाच मेळाव्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र तरीही मोठ्या गर्दी झाली होती. आता यावर्षी कुठलेही निर्बंध नाहीत अशात पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत अशा बातम्या येत आहेत. त्यामुळे यावर्षीच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. आता दसरा मेळाव्यात त्या काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp