Naba Das : शनी शिंगणापूरला १ कोटींचं दान देणाऱ्या नेत्याचा गोळीबारात मृत्यू

मुंबई तक

29 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:11 AM)

Odisha Health Minister Naba Das succumbs : ओडिसा : राज्याचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंत्री नबा दास यांच्या निधनाबद्दल माहिती देत तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केलं. नबा दास सरकार आणि पक्ष या दोघांसाठीही मोठी संपत्ती होते. त्यांच्या निधनाने ओडिसा राज्याचं मोठं […]

Mumbaitak
follow google news

Odisha Health Minister Naba Das succumbs :

हे वाचलं का?

ओडिसा : राज्याचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंत्री नबा दास यांच्या निधनाबद्दल माहिती देत तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केलं. नबा दास सरकार आणि पक्ष या दोघांसाठीही मोठी संपत्ती होते. त्यांच्या निधनाने ओडिसा राज्याचं मोठं नुकसान झालं असल्याची भावनाही मुख्यमंत्री पटनायक यांनी व्यक्त केली. (Odisha Health Minister Naba Das succumbs to bullet injuries after being shot by a policeman in Jharsuguda district earlier today)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्री नबा दास हे ब्रजरानगर येथील सत्ताधारी बीजू जनता दलच्या कार्यालयचे उद्घाटन करण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी गांधी चौकामध्ये उतरुन ते पायी पक्ष कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले होते. अचानक गोपालचंद्र दास या पोलीस अधिकाऱ्याने नबा दास यांच्यावर गर्दीमध्ये येऊन गोळी झाडली. यावेळी दास यांच्या छातीत गोळी लागली होती.

गोळीबारानंतर नबा दास यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने झारसुगुड़ा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना राजधानी भुवनेश्वरला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भेट देवून नबा दास यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसंच त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करुन त्यांना धीर दिला होता.

दरम्यान, या घटनेनंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. ओडिसा पोलीस घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती. तसंच राज्याच्या आरोग्य मंत्र्यावर भर चौकात गोळीबाराची घटना कशी घडली? सुरक्षा व्यवस्थेत एवढी मोठी चूक कशी झाली. याबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने नेमकं हे कृत्य का केलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

नबा दास यांचं महाराष्ट्र कनेक्शन :

नबा दास यांचं महाराष्ट्राशीही खास नात होतं. नाबा दास यांची शनी शिंगणापूर येथील शनीवर मोठी श्रद्धा होती. नुकतेच शनी देवस्थानला मोठ्या प्रमाणात देणगी देऊन ते चर्चेत आले होते. दास यांनी शनि शिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा कलश दान केला होता. १.७ किलो सोने आणि ५ किलो चांदीचे कलश दान केला होता.

    follow whatsapp