Mehul Choksi च्या मुंबईतल्या घराबाहेर नोटीसा आणि समन्सचा खच, 95 लाखांचा मेंटेनन्सही थकीत

सौरभ वक्तानिया

• 12:58 PM • 29 May 2021

PNB घोटाळा प्रकरणातील आरोप आणि फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी थोडी वाट बघावी लागू शकते. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचं प्रकरण डोमनिका येथील कायदेशीर पेचप्रसंगात अडकलं आहे. भारतातले अधिकारी हे कायदेशी प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. अशात मेहुल चोक्सीच्या मुंबईतल्या घराचं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. इंडिया टुडे ग्रुपने याबाबत शोध घेतला. मेहुल चोक्सीचं […]

Mumbaitak
follow google news

PNB घोटाळा प्रकरणातील आरोप आणि फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी थोडी वाट बघावी लागू शकते. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचं प्रकरण डोमनिका येथील कायदेशीर पेचप्रसंगात अडकलं आहे. भारतातले अधिकारी हे कायदेशी प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. अशात मेहुल चोक्सीच्या मुंबईतल्या घराचं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. इंडिया टुडे ग्रुपने याबाबत शोध घेतला. मेहुल चोक्सीचं घर मुंबईतल्या आलिशान समजल्या जाणाऱ्या वाळकेश्वर भागात आहे. तिथे इंडिया टुडेने पाहणी केली असता आम्हाला तिथे दिसला नोटीस आणि समन्सचा खच. काही नोटीसा चिटकवण्यात आल्या आहेत. काही समन्स खाली पडले आहेत. त्यामुळे घराचा दरवाजाही नीट दिसत नाही अशी स्थिती आहे. या नोटीसा आणि समन्स 2018 पासून आत्ताच्या तारखांपर्यंत लावण्यात आले आहेत. एवढंच नाही त्याच्या आलिशान घराचा 95 लाखांचा मेंटेनन्सही थकला आहे.

हे वाचलं का?

मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे दोघेही 13 हजार 500 चुना पंजाब नॅशनल बँकेला लावून भारताबाहेर पळाले आहेत. नीरव मोदीला लंडनमध्ये शिक्षा झाली आहे तो लंडनच्या तुरुंगात आहे. तर मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असला तरीही काही कायदेशीर पूर्तता बाकी आहेत. या दोघांनाही भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करतं आहे.

मेहुल चोक्सीचं मुंबईतलं घर हे वाळकेश्वर या ठिकाणी आहे. गोकुळ अपार्टमेंटमध्ये मेहुल चोक्सीचा ड्युप्लेक्स फ्लॅट नवव्या आणि दहाव्या मजल्यावर आहे. इंडिया टुडेने या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता फ्लॅटच्या दरवाजाच्या बाहेर नोटीसा आणि समन्स यांचा खच पाहण्यास मिळाला. या ठिकाणी इतके समन्स आणि नोटीसा लावण्यात आल्या आहेत की त्यातल्या काही खालीही पडून गेल्या आहेत.

हे समन्स आणि नोटीसा विविध बँका, ED, आयकर ऑफिस यांच्या आहेत. एवढंच नाही तर इमारतीचा मेंटनेन्स दिला नाही म्हणूनही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मेहुल चोक्सीच्या या घराचा 95 लाख रूपयांचा मेंटेनन्सही थकला आहे. ED, आयकर ऑफिसेस यांच्या नोटीसांमधून, समन्समधून मेहुल चोक्सीला तातडीने कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटीसा आणि समन्स इतक्या प्रमाणात आहेत की ते लावण्यासाठी दरवाजा आणि भिंतही अपुरी पडते आहे हेच दिसून येतं आहे. काही समन्स आणि नोटिसा या तर जमिनीवरही पडल्या आहेत. मेहुल चोक्सीच्या घराबाहेर नोटीसा, समन्स यांच्या खच पाहण्यास मिळतो आहे.

    follow whatsapp