Kashi Vishwanath : काशी विश्वनाथ कॉरिडॉरची नजर खिळवून ठेवणारी दृश्ये

मुंबई तक

• 01:40 AM • 13 Dec 2021

काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या लोकार्पणापूर्वी याची नजर खिळवून ठेवणारे फोटो समोर आले आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही फोटो शेअर केले. या फोटोतून काशी विश्वनाथ कॉरिडॉर किती भव्यदिव्य उभारण्यात आलं आहे, हे दिसून येत आहे. काशी विश्वनाथ मंदिरासह त्याच्या आजूबाजूला […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या लोकार्पणापूर्वी याची नजर खिळवून ठेवणारे फोटो समोर आले आहेत.

काशी विश्वनाथ कॉरिडॉर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही फोटो शेअर केले.

या फोटोतून काशी विश्वनाथ कॉरिडॉर किती भव्यदिव्य उभारण्यात आलं आहे, हे दिसून येत आहे.

काशी विश्वनाथ मंदिरासह त्याच्या आजूबाजूला उभारण्यात आलेलं नवीन मंदिरं, मंडप आदी या फोटोमध्ये दिसत आहे.

विशेषतः लोकार्पणाच्या पूर्वसंध्येला काशी विश्वनाथ कॉरिडॉरवर रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सर्व परिसर उजळून निघाला होता.

काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रोजेक्ट तयार होण्यासाठी 2 वर्ष 8 महिने इतका कालावधी लागला.

याच काशी विश्वनाथ मंदिरांचा अहिल्याबाई होळकर यांनी 1669 मध्ये जिर्णोद्धार केला होता.

या जिर्णोद्धाराला जवळपास 352 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जिर्णोद्धाराची पायाभरणी केली.

8 मार्च 2019 रोजी काशी विश्वनाथ कॉरिडॉरची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली होती.

काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं 95 टक्के काम पूर्ण झालं असून, सध्या या ठिकाणी 2600 मजूर, 300 अभियंते तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत.

काशी विश्वनाथ धामलाच काशी विश्वनाथ कॉरिडॉर असं संबोधलं जात असून, यात लहान-मोठ्या 23 इमारती आणि 27 मंदिरांचा समावेश आहे. याची दोन भागांमध्ये विभागणी केलेली असून, 4 प्रवेशद्वार आहेत. याच्या चोहीबाजूने प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्गही तयार करण्यात आला आहे.

    follow whatsapp