नवरा-बायकोच्या भांडणाचा पोलिसांना त्रास, रात्री फोन करुन शिवीगाळ करणाऱ्या माथेफिरु पतीला अटक

मुंबई तक

• 04:10 PM • 05 Apr 2022

– मिथीलेश गुप्ता, डोंबिवली प्रतिनीधी नवरा-बायकोच्या भांडणात सहसा इतरांनी पडू नये असं म्हणतात. डोंबिवली शहरातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना एका नवरा-बायकोच्या भांडणाचा त्रास सहन करावा लागला आहे. बायकोशी भांडण करुन आरोपी पती गेल्या वर्षभरापासून मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करुन अर्वाच्च शिवीगाळ करायचा. सुरुवातीचे काही महिने पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं. परंतू ज्यावेळी आरोपीने मानपाडा पोलीस ठाण्याचे […]

Mumbaitak
follow google news

– मिथीलेश गुप्ता, डोंबिवली प्रतिनीधी

हे वाचलं का?

नवरा-बायकोच्या भांडणात सहसा इतरांनी पडू नये असं म्हणतात. डोंबिवली शहरातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना एका नवरा-बायकोच्या भांडणाचा त्रास सहन करावा लागला आहे. बायकोशी भांडण करुन आरोपी पती गेल्या वर्षभरापासून मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करुन अर्वाच्च शिवीगाळ करायचा. सुरुवातीचे काही महिने पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं.

परंतू ज्यावेळी आरोपीने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचा नंबर मिळवत त्यांना शिवीगाळ केल्यानंतर पोलिसांनी या माथेफिरु पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत कंन्सारा हा देसले पाड्यातील विनायक कुंडल सोसायटीत राहतो. या माथेफिरूने जस्ट डायल या वेबसाईटवरुन पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचा मोबाईल नंबर मिळवला. पोलीस ठाण्यात हा बदमाश वारंवार फोन करून, विनाकारण व अर्वाच्च भाषेत बोलून शिवीगाळी करत असे. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी करण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रशांत आंधळे यांच्यासह हवालदार विजय कोळी आणि पोलिस नाईक महादेव पवार हे तिघे हेमंत कंन्सारा याच्या घरी गेले.

धक्कादायक ! I Love You Death अशी चिठ्ठी लिहून ठेवत विद्यार्थिनीची आत्महत्या

चौकशी सुरू असताना आरोपीने पोलीस नाईक महादेव पवार यांची कॉलर पकडली. तसेच हवालदार विजय कोळी आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांना धक्का मारला. त्यानंतर आरोपीने तिकडून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी पकडून त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. तेथेही या माथेफिरूने पोलीस अधिकारी आंधळे यांची कॉलर पकडली आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली. पोलीसांनी हस्तक्षेप करत या माथेफिरूला रोखले असता त्याने शिवीगाळ, धाक-धमक्या आणि सरकारी कामात अडथळा आणत हंगामा केला. ज्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक करुन कोर्टासमोर हजर केलं असून कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

    follow whatsapp