पुणे: कार थेट विहिरीत कोसळली, 30 वर्षीय महिलेचा मृत्यू; पतीने मात्र बचावला जीव

मुंबई तक

• 01:04 PM • 14 Dec 2021

स्मिता शिंदे, शिरुर पुणे: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथे कारवरील ताबा सुटल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळल्याने एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली नुकतीच समोर आली आहे. वर्षा आदक असं मृत महिलेचं नाव असून समोरून टू-व्हिलर आल्याने कारवरील ताबा सुटून ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळली ज्यामध्ये महिलेचा […]

Mumbaitak
follow google news

स्मिता शिंदे, शिरुर पुणे: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथे कारवरील ताबा सुटल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळल्याने एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली नुकतीच समोर आली आहे.

हे वाचलं का?

वर्षा आदक असं मृत महिलेचं नाव असून समोरून टू-व्हिलर आल्याने कारवरील ताबा सुटून ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळली ज्यामध्ये महिलेचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.

दरम्यान, या वेळी बाजूला बसलेल्या महिलेच्या पतीने कारमधून तात्काळ उडी मारल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला आहे.

दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या अपघाताच्या घटनेबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, या प्रकरणी महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे की, काही घातपाताचा प्रकार आहे हे देखील आता पोलीस तपास सुरु झाला आहे. कारण ज्या पद्धतीने महिलेचा मृत्यू झाला आहे. ते लक्षात घेता पोलीस आता या प्रकरणी सविस्तर तपास करणार असल्याचं समजतं आहे.

400 फूट खोल दरीत कोसळली कार; वयोवृद्ध आईसह मुलाचा जागेवरच मृत्यू

शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फुट खोल दरीत कार कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75) अशी मृतांची नावे आहेत.

गजानन वावरे हे सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीत होते. सोसायटीची निवडणूक असल्याने ते मतदानासाठी सोमवारी (13 डिसेंबर) थदाळे या आपल्या मूळगावी आले होते.

आज सकाळी गजानन वावरे हे त्यांच्या आईसह परत नाशिककडे जात होते. नाशिकच्या दिशेने जात असताना शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात त्यांची कार अपघातग्रस्त झाली.

अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या गाडीला भीषण अपघात, एअर बॅगमुळे थोडक्यात बचावले!

वावरे यांची कार भवानी घाटात 400 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये गजानन वावरे यांच्यासह त्यांची आई हिराबाई वावरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आलं.

    follow whatsapp