रानटी डुकराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई तक

• 07:50 AM • 03 Feb 2022

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलीसांनी रानटी डुकराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन नळी, बारा बोर बंदुक, १५ काडतुसे, एक झायलो कार आणि ३५ किलो रानटी डुकराचे मटण असा एकुण ४ लाख ९२ हजार २९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीवर्धन पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काही शिकारी विनापरवाना वन्यजीव हद्दीत शिकारीसाठी घुसले होते. यासाठी […]

Mumbaitak
follow google news

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलीसांनी रानटी डुकराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन नळी, बारा बोर बंदुक, १५ काडतुसे, एक झायलो कार आणि ३५ किलो रानटी डुकराचे मटण असा एकुण ४ लाख ९२ हजार २९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे वाचलं का?

श्रीवर्धन पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काही शिकारी विनापरवाना वन्यजीव हद्दीत शिकारीसाठी घुसले होते. यासाठी पोलिसांनी १५ दिवस सापळा रचला होता. अखेरीस बागमांडला हद्दीतील मोहीतेवाडी कंपाऊंडमध्ये पोलिसांनी रानडुकराची शिकार केल्याचं आढळून आलं.

शर्यतीदरम्यान बैलगाडी घुसली प्रेक्षकांमध्ये, तिघे जखमी; थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

या घटनेची सखोल चौकशी केली असता, पोलिसांनी चार्ली अँथनी वैती आणि ग्लेन डॉमनिक वैती यांना मुंबईच्या कांदिवली भागातून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक आल्हाट या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp