Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं खास डुडल

मुंबई तक

• 03:12 AM • 26 Jan 2022

भारतात 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. इंटरनेट सर्च इंजिन गुगलनेदेखील भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त खास डुडल तयार केले आहे. गुगलच्या या खास डुडलमध्ये उंट, हत्ती, घोडे, तबला, कबूतर, सॅक्सोफोन आदींचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात भारताची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य दिसून येणार […]

Mumbaitak
follow google news

भारतात 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. इंटरनेट सर्च इंजिन गुगलनेदेखील भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त खास डुडल तयार केले आहे. गुगलच्या या खास डुडलमध्ये उंट, हत्ती, घोडे, तबला, कबूतर, सॅक्सोफोन आदींचा समावेश आहे.

हे वाचलं का?

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात भारताची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य दिसून येणार आहे. गुगलच्या डुडलमध्ये एक हत्ती, एक घोडा, एक कुत्रा, एक उंट, तबला, संचलन मार्ग, आयकॉनिक कॅमल-माउंटेड बँडचा भाग म्हणून सॅक्सोफोन, कबूतर आणि राष्ट्रध्वज दर्शवणारा तिरंगा रंगाचा समावेश करण्यात आला आहे.

कसा साजरा होणार आजचा प्रजासत्ताक दिन?

सकाळी 10.05 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख पंतप्रधान पंतप्रधानांसोबत उपस्थित राहणार आहेत.

भारत यावर्षी आपला 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाचा उत्सव काही दिवसांपूर्वीच सुरू झाला होता. 1947 मध्येच देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, मात्र तीन वर्षांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तथापि, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली म्हणून देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 26 जानेवारीच्या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे परेड. जी दिल्लीच्या राजपथपासून सुरू होते आणि इंडिया गेटपर्यंत जाते.

या वर्षी या परेडमध्ये विविध राज्ये, विभाग आणि सशस्त्र दलांच्या 16 लष्करी तुकड्या, 17 लष्करी बँड आणि 25 चित्ररथांचा समावेश असतो. या दिवशी राष्ट्रपती राजपथावर ध्वजारोहण करतात.

या कार्यक्रमात भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाने भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे प्रदर्शन करत असतं. यासोबतच राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ येतात, जे त्या-त्या राज्यातील संस्कृती दर्शवतात. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोची पार्किंग सेवा बंद करण्यात आली आहे. तर अनेक स्थानकांवर काही तासांसाठी एक्झिट आणि एंट्री बंद ठेवण्यात येईल.

    follow whatsapp