पुणे : हडपसर भागात घरफोडी, चोरट्यांनी ८८ लाखांचा मुद्देमाल पळवला

पुण्याच्या हडपसर भागातील एका घरात चोरट्यांनी घरफोडी करत ८८ लाखांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. हडपसरमधील शेवाळवाडी भागात राहणाऱ्या विवेक चोरघडे यांच्या घरी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेवाळवाडी भागात विवेक चोरघडे यांचा बरकत हा बंगला आहे. चोरघडे आपल्या कुटुंबासोबत ९ ते १९ ऑगस्ट दरम्यान बाहेरगावी फिरायला गेले होते. या काळात चोरघडे यांचं घर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:27 PM • 20 Aug 2021

follow google news

पुण्याच्या हडपसर भागातील एका घरात चोरट्यांनी घरफोडी करत ८८ लाखांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. हडपसरमधील शेवाळवाडी भागात राहणाऱ्या विवेक चोरघडे यांच्या घरी ही घटना घडली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेवाळवाडी भागात विवेक चोरघडे यांचा बरकत हा बंगला आहे. चोरघडे आपल्या कुटुंबासोबत ९ ते १९ ऑगस्ट दरम्यान बाहेरगावी फिरायला गेले होते. या काळात चोरघडे यांचं घर बंद असल्यामुळे चोरट्यांनी डाव साधत घरफोडी करुन मुद्देमाल लंपास केलाय.

चोरट्यांनी चोरघडे यांच्या घरातील सोनं-चांदी आणि परकीय चलन असा मिळून ८८ लाख ३८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

मुंबईकडे येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; लाखो रुपये जप्त

    follow whatsapp