Russia Ukraine War : रशियाचा खार्किव्हमध्ये पुन्हा हल्ला; ८ नागरिक ठार

मुंबई तक

• 02:21 AM • 02 Mar 2022

युक्रेनवर आक्रमण केलेल्या रशियाचे हल्ले अजूनही सुरूच आहे. दिवसेंदिवस रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता वाढत असून, खार्किव्हमध्ये मिसाईल डागण्यात आली. नागरी वस्तीमध्येच मिसाईल हल्ला करण्यात आल्याची माहिती असून, यात एका रुग्णालयाचंही नुकसान झालं आहे. या हल्ल्यात ८ नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनमधील सर्वात मोठ्या शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खार्किव्हमध्ये रशियाकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. […]

Mumbaitak
follow google news

युक्रेनवर आक्रमण केलेल्या रशियाचे हल्ले अजूनही सुरूच आहे. दिवसेंदिवस रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता वाढत असून, खार्किव्हमध्ये मिसाईल डागण्यात आली. नागरी वस्तीमध्येच मिसाईल हल्ला करण्यात आल्याची माहिती असून, यात एका रुग्णालयाचंही नुकसान झालं आहे. या हल्ल्यात ८ नागरिक मरण पावले आहेत.

हे वाचलं का?

युक्रेनमधील सर्वात मोठ्या शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खार्किव्हमध्ये रशियाकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. मंगळवारीही सेंट्रल फ्रीडम स्वेअरमध्ये स्फोट झाला होता. आता पुन्हा एकदा रशियाकडून मिसाईल डागण्यात आली आहे.

युक्रेन-रशिया युद्धात प्रियंका चतुर्वेदी पोलंडच्या राजदुतांशी ट्विटरवर का भिडल्या?

रशियन सैन्याने नागरी भागालाच निशाणा बनवत मिसाईल डागली. ज्यात ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. खार्किव्हमध्ये रशियन सैन्याकडून सुरू हल्ल्यांमुळे कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. सायंकाळी ४ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे.

प्रशासनाकडून रस्त्यावर येण्यास आणि कार वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धोक्याचा इशारा देण्यात आल्यानंतर शेल्टरमध्ये जाण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे.

‘टीव्ही टॉवर’जवळ हल्ला

कीव्ह शहरातील टीव्ही टॉवर जवळ रशियाकडून हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत पाच नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचं युक्रेननं म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे टीव्ही चॅनेल्सच्या प्रसारणावरही परिणाम झाला.

रशिया-युक्रेन युद्ध: दुतावासाची लोकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाही! नवीनच्या वडीलांचा आरोप

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी स्फोटाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा स्फोट खार्किव्हमधील सेंट्रल फ्रीडम स्वेअर येथे झालेला असून, स्फोट होतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. “सेंट्रल फ्रीडम स्वेअर आणि खार्किव्हमधील नागरी जिल्ह्यांवर रशियाकडून निर्दयी मिसाईल हल्ले. युक्रेनला नेस्तनाबूत करण्यात अपयशी ठरले आहेत. आता त्वेषाने जास्त युद्ध हिंसा करत आहेत. जग खूप काही करु शकते आणि केलं पाहिजे. रशियावर दबाव टाका आणि वेगळं पाडा,” असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी म्हटलेलं आहे.

जेवण आणायला गेला, परत आलाच नाही; नवीनचा मृत्यू नेमका कसा झाला?

भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

खार्किव्हमध्ये रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता वाढली असून, मंगळवारी (१ मार्च) करण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. खार्किव्हमध्ये कर्फ्यू हटवण्यात आल्यानंतर खाण्यासाठी सामान आणायला गेलेल्या कर्नाटकातील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याला रशियाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला.

    follow whatsapp