Saif Ali Khan Live Updates : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका चोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. रात्री 2 वाजता एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला. हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेत्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, याप्रकरणी सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काल रात्री एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मोलकरणीशी झटापट झाली. त्या दोघांमधील झटापट पाहून, सैफ धावून गेला. यावेळी त्याने सैफवर चाकूने वार केले. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे.
या संपूर्ण घटनेबद्दलचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'मुंबई Tak'
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 05:06 PM • 16 Jan 2025Saif Ali Khan Case Updates : सैफच्या घरात शिरलेल्या चोराबद्दल पोलिसांना मोठा संशय, काय म्हणाले पोलीस?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरी चोरी आणि हल्ला करणारा व्यक्ती सराईत गुन्हेगार असू शकतो. घटनेची मोडस ऑपरेंडी पाहत, हल्लेखोराविरुद्ध यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असण्याची शक्यता आहे. पोलिसांना असा विश्वास आहे की, फक्त एक धूर्त आणि जुना आरोपीच अशी घटना घडवू शकतो. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम 311,312,331(4), 331(6), 331(7) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
- 04:04 PM • 16 Jan 2025Saif Ali Khan Health Updates : चाकू हाडापर्यंत गेला, डॉक्टरांनी सांगितलं शस्त्रक्रिया कशी केली?
डॉ. लीलावती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी म्हणाले, “सुदैवाने, सैफ अली खान यांची शस्त्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे झाली आहे. तो बरा होत आहे, ऑपरेशन संपलं आहे आणि त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. एक-दोन दिवसांत त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवले जाईल. त्यानंतरही, त्याला काळजी घ्यावी लागेल. जखमा जास्त खोल होत्या, पण आमच्या डॉक्टरांनी आणि वैद्यकीय पथकाने चांगल्या प्रकारे उपचार केले आहेत.”
मुंबईतील लीलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे म्हणाले, “श्री सैफ अली खान यांना आज पहाटे 3.00 वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले. त्याच्या मणक्यात चाकू घुसल्यामुळे त्याच्या मणक्याला मोठी दुखापत झाली. चाकू काढण्यासाठी आणि गळणारे स्पाइनल फ्लुइड दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला आणि मानेला उजव्या बाजूला आणखी दोन खोल जखमा होत्या. ज्या डॉ. लीना जैन यांच्या नेतृत्वाखालील प्लास्टिक सर्जरी टीमने दुरुस्त केल्या. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा यांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवलं. तो आता पूर्णपणे स्थीर आहे आणि धोक्याबाहेर आहे. आम्ही उद्या सकाळी आयसीयूमधून बाहेर पडू आणि एक-दोन दिवसांत डिस्चार्जची योजना आखू. लीलावती हॉस्पिटलचे स्थायी विश्वस्त श्री प्रशांत मेहता म्हणाले, "श्री सैफ अली खान यांची प्रकृती सुधारत आहे, आम्ही लीलावती हॉस्पिटल टीमकडून कुटुंबाला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याची हमी देतो."
- 01:37 PM • 16 Jan 2025Saif Ali Khan Case Live Updates : पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली? काय समोर आलं?
मुंबई पोलिसांच्या पथकाने सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला पोलिस ठाण्यात आणलं असून, तिची चौकशी केली जात आहे. जेव्हा ती व्यक्ती घरात शिरली तेव्हा मोलकरणीने त्याला पाहिले आणि ओरडायला सुरूवात केली होती. त्यानंतर घरात उपस्थित असलेला सैफ अली खान तिथे पोहोचला.
त्यानंतर हाणामारी झाली आणि मोलकरणीच्या हाताला दुखापत झाली. सीसीटीव्हीमध्ये कोणीही येताना किंवा जाताना दिसत नाही.मुख्य गेटमधून कोणीही आत शिरलं नाही. पोलीस मोलकरणीचा जबाब नोंदवत आहेत. पोलिसांना अद्याप जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. घटना घडली तेव्हा सैफ, करीना आणि मुलं घरीच होते. हल्ल्यानंतर सैफ अली खानने त्याच्या घरातून पोलिसांना फोन केला.
- 01:26 PM • 16 Jan 2025सैफ-करीनाच्या टीमने काय म्हटलं?
"सैफच्या पीआर टीमने जारी केलेल्या निवेदनानुसार, सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना संयम राखण्याचे आवाहन करतोय. ही पोलीस केस आहे. आम्ही तुम्हाला परिस्थितीबद्दल अपडेट देत राहू."
- 12:58 PM • 16 Jan 2025Saif Ali Khan Live Updates : हल्ला करणारा हा आधीच आत आला होता?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणण्यानुसार, काल रात्री एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मोलकरणीशी झटापट झाली. त्या दोघांमधील झटापट पाहून, सैफ धावून गेला. यावेळी त्याने सैफवर चाकूने वार केले. दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. सैफ अली खानचा फ्लॅट हा 12 व्या मजल्यावर आहे. त्यामुळे एवढ्या वर चोर गेला कसा हा प्रश्न कायम आहे. तसंच हा व्यक्ति घरात येईपर्यंत इतर लोक किंवा सुरक्षा रक्षक असतील, तर ते काय करत होते. कारण, याप्रकरणातली सर्वात मोठी अपडेट अशी समोर आली आहे की, सैफच्या घरात कुणीही जाताना दिसलं नव्हतं. त्यामुळे हल्ला करणारा हा आधीच आत आला होता? अशीही शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
