Shiv Sena: केंद्र सरकारच्या विशेष पॅकेजबाबत अग्रलेखातून शिवसेनेचे भाजपला चिमटे

मुंबई तक

• 03:41 AM • 30 Jun 2021

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दोन दिवसांपूर्वी एका विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. ज्यावरुन आता शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून मोदी सरकारला (Modi Govt) बरेच चिमटे काढण्यात आले आहेत. ‘ही ‘लस’ अर्थव्यवस्थेसाठी प्रभावी ठरते की आणखी एक पॅकेज अशी त्याची नोंद होते हे भविष्यातच समजेल.’ असा टोला सामनाच्या अग्रलेखातून (Saamana […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दोन दिवसांपूर्वी एका विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. ज्यावरुन आता शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून मोदी सरकारला (Modi Govt) बरेच चिमटे काढण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

‘ही ‘लस’ अर्थव्यवस्थेसाठी प्रभावी ठरते की आणखी एक पॅकेज अशी त्याची नोंद होते हे भविष्यातच समजेल.’ असा टोला सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) यावेळी लगावण्यात आला आहे.

विशेष पॅकेजवरुन केंद्र सरकारवर टीका-टिप्पणी

केंद्र सरकारने अर्थव्यवसथा रुळावर आणण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा केल्यानंतर आता याची अंमलबजावणी कशी होणार याबाबत शिवसेनेने सामनातून बरीच टीकाटिप्पणी केली आहे.

‘सरकारकडून जाहीर होणारी आर्थिक पॅकेज ही तशी टीकेची धनीच होत असतात. या टीकेत तथ्य नसते असे नाही.’ असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं गेलं आहे.

गंगेच्या पात्रातील मृतदेहांवरुन भाजपवर निशाणा

दरम्यान, याचवेळी उत्तर प्रदेशातील गंगा नदीत सापडलेल्या मृतदेहांवरुन देखील शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला. ‘उत्तर प्रदेशमध्ये तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह हे गंगेत सोडून द्यावे लागले. या अनुभवाने सरकार शहाणे झाले म्हणा किंवा उशिरा त्यांना शहाणपण सुचले म्हणा.’ असं म्हणत पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मृतदेहांच्या मुद्द्यावरुन यावेळी सामनातून टीका करण्यात आली.

कौतुक आणि टोमणे

सामनाच्या अग्रलेखात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या काही निर्णयाचं कौतुक करण्यात आलं असलं तरी त्यातील काही मुद्द्यांबाबत भाष्य करताना टीकाच करण्यात आली आहे. ‘विशेष पॅकेजमुळे लघु, मध्यम व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, पर्यटन संस्था यांना होणार आहे. पण हा फायदा थेट अर्थ सहाय्याच्या माध्यमातून नसून तो विनातारण कर्ज स्वरुपात आहे.’ असं म्हणत पॅकेजमधील त्रुटींवर अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.

पर्यटन व्यवसायाबाबत व्यक्त केली चिंता

दरम्यान, यावेळी पर्यटन उद्योगाबाबत अग्रलेखातून बरीच चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. ‘ज्या पर्यटन व्यवसायाचा उल्लेख केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला त्या पर्यटन व्यवसायासाठी हा दिलासा म्हटला तर आहे, म्हटला तर नाही. कोरोनाच्या लाटांचे इशारे आणि त्यामुळे लागू केले जाणारे निर्बंध या सगळ्यामध्ये पर्यटन व्यवसाय सापडलेला आहे.’ असं म्हणत पर्यटन व्यवसायाबाबत देखील सामनातून भाष्य करण्यात आलं आहे.

Nirmala Sitharaman: PF बाबत सरकारची मोठी घोषणा, मोदी सरकारकडून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर

सध्या कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी सरकारने पॅकेज जाहीर केलं आहे. अशावेळी त्यावरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. अशावेळी आता सामनातील या अग्रलेखानंतर भाजपकडून याला नेमकं कशा पद्धतीने उत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp