Uddhav Thackeray : ठाकरे गटाने भाजपची व्होट बँक केली टार्गेट?

ऋत्विक भालेकर

09 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

Shivsena (UBT) | Jain community news : मुंबई : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांनी आता थेट भाजपची (BJP) कोअर व्होट बँकच टार्गेट केली आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. याचं कारण ठरलं आहे ते उद्धव ठाकरे यांनी मागील एका महिन्यात जैन समाजाच्या (Jain community) कार्यक्रमाला दुसऱ्यांदा लावलेली हजेरी. […]

Mumbaitak
follow google news

Shivsena (UBT) | Jain community news :

हे वाचलं का?

मुंबई : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांनी आता थेट भाजपची (BJP) कोअर व्होट बँकच टार्गेट केली आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. याचं कारण ठरलं आहे ते उद्धव ठाकरे यांनी मागील एका महिन्यात जैन समाजाच्या (Jain community) कार्यक्रमाला दुसऱ्यांदा लावलेली हजेरी. ठाकरे हे गुरुवार (९ फेब्रुवारी) ला मीरा-भायंदर येथे जैन मंदिरात अंजन शलाका महोत्सवात सहभागी झाले होते. तर यापूर्वी त्यांनी ठाण्यातील जैन समुदायाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. (Shivsena chief uddhav Thackeray target Jain community in mumbai ahead of bmc polls)

इंडिया टूडे- सी व्होटर्सच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये गुजराती, राजस्थानी, मारवाडी आणि जैन समजाची संख्या जवळपास १४ टक्के आहे. यात जैन समजाचं मोठं प्राबल्य आहे. हा समाज मागील अनेक काळापासून भाजपसोबत जोडलेला आहे. २०१७ ला याच १४ टक्के समाजापैकी जवळपास ६५ टक्के मतदान भाजपला झाले होते. त्यामुळे आता शिवसेनेला पुन्हा सत्तेपर्यंत नेण्यासाठी ठाकरे यांनी ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे.

‘Uddhav ठाकरे जंटलमन, मनात कपटीपणा नाही’, माजी CM कडून प्रचंड कौतुक

२६ जानेवारीला ठाण्याच्या कार्यक्रमात उपस्थिती :

२६ जानेवारीला उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील जैन धर्मियांना अत्यंत महत्वाच्या असलेल्या टेंभी नाका येथील मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. यावेळी त्यांनी जैन समाजाला शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच जैन मुनींचे आशीर्वादही घेतले होते. यावेळी मुनींनीही भरभरून स्तुती करून ठाकरेंना आशीर्वाद दिले होते.

Uddhav Thackeray आनंदाश्रमासमोरुन गेले पण गाडी थांबली नाही… काय घडलं?

पर्युषण पर्वाला होता शिवसेनेचा विरोध :

जैन धर्मियांचा पर्युषण पर्वाला शिवेसनेचा विरोध होता. पर्युषणाच्या काळात उघड्यावर मांसविक्री करण्यास बंदी घालू नये, अशी मागणी करत शिवसेनेने आंदोलन पुकारले होते. जैन बांधव शत्रू नाहीत. पण कोण काय खातो? याचा धर्माशी काहीही संबंध नाही. उलट हा आहाराचा विषय आहे, धर्माचा नाही, असं म्हणतं शिवसेनेने सामना अग्रलेखातून त्यावेळी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळेच आता कधीकाळी जैन धर्मियांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पक्षाचे नेते एका महिन्यात दोनवेळा त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

    follow whatsapp