Tamilnadu Unique Marriage : सोशालिझम आणि ममता बॅनर्जी यांचं लग्न

मुंबई तक

• 01:25 PM • 15 Jun 2021

तामिळनाडूत सध्या एका आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सोशलाझिम आणि ममता बॅनर्जी यांचं लग्न झालं आहे. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलंत सोशालिझम आणि ममता बॅनर्जी या दोघांचं लग्न झालं आहे. तामिळनाडूच्या सालेममध्ये रविवारी हे लग्न पार पडलं. या लग्नातल्या वर-वधूच्या नावांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. एवढंच नाही तर लग्नात सहभागी झालेल्या लोकांचीही चर्चा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

तामिळनाडूत सध्या एका आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सोशलाझिम आणि ममता बॅनर्जी यांचं लग्न झालं आहे. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलंत सोशालिझम आणि ममता बॅनर्जी या दोघांचं लग्न झालं आहे. तामिळनाडूच्या सालेममध्ये रविवारी हे लग्न पार पडलं. या लग्नातल्या वर-वधूच्या नावांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. एवढंच नाही तर लग्नात सहभागी झालेल्या लोकांचीही चर्चा होते आहे. कारण या लग्नात कम्यनिझम, लेनिनिझम, मार्क्सिझम हे वराती म्हणून आले होते. हे कोणतंही राजकीय व्यासपीठ नव्हतं. तर लग्नातल्या वर-वधूंची आणि वराती म्हणून आलेल्या सगळ्यांची ही खरी नावं आहेत.

हे वाचलं का?

सालेम जिल्ह्यातील कोंडलपट्टीच्या कत्तूर भागात हे अनोखं लग्न पार पडलं. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नातल्या नवऱ्या मुलाचं नाव सोशलिझम यांच नाव त्याच्या वडिलांनी ठेवलं आहे. सोशलिझमचे वडील ए मोहन हे CPI चे जिल्हा सचिव आहेत. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर कम्युनिझम संपलं. त्यावेळी मी माझ्या मुलांची नावं कम्युनिझम, लेनिनिझम आणि सोशलिझम अशी ठेवली. नवऱ्या मुलीचं नाव ममता बॅनर्जी असणं हा फक्त एक योगायोग आहे.

या लग्नात अनेक लोकांची उपस्थिती होती. तर या लग्नातल्या वधू-वरांना अनेकांनी फोनवरूनही आशीर्वाद दिले. यावेळी नवऱ्या मुलीनेही असं सांगितलं की ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान झाल्या आहेत. मला या नावाचं महत्त्व माहित आहे असं या मुलीने म्हटलं आहे.

माझं नाव सोशालिझम आहे त्यावरून मला शाळेत असताना चिडवलं जात असे. मात्र आता कुणी चिडवत नाही असं सोशालिझमने सांगितलं. सोशालझिमचा भाऊ कम्युनिझम हा वकील आहे. लेनिनिझमचं चांदीचे पैंजण तयार करण्याचं युनिट आहे. हे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडलं. दोन्हीकडचे पाहुणे या लग्नात सहभागी झाले होते. यावेळी सोशालिझमचे भाऊ कम्युनिझम, लेनिनिझम आणि मार्किसिझम हे देखील लग्नात सहभागी झाले होते.

    follow whatsapp