Union Budget 2023 : अर्थसंकल्पातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

मुंबई तक

01 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:10 AM)

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला (Union Budget) . यात प्रामुख्याने (Income Tax) आयकरमध्ये सूटची घोषणा ही बाब महत्वाची राहिली (Important things). अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, नवीन करप्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयेपर्यंत असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. यासह अर्थमंत्र्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा […]

Mumbaitak
follow google news

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला (Union Budget) . यात प्रामुख्याने (Income Tax) आयकरमध्ये सूटची घोषणा ही बाब महत्वाची राहिली (Important things). अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, नवीन करप्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयेपर्यंत असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. यासह अर्थमंत्र्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे बजेट सादर केला. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 2.40 लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. जो 2014 च्या तुलनेत नऊ पट आहे. यासह सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतुदीची घोषणा केली, जी मागच्या वर्षीच्या तुलनेत 33% आहे. तर पाहूया आजच्या अर्थसंकल्पाचे काही ठळक मुद्दे. (These are the important issues in the budget)

हे वाचलं का?

Budget 2023 : निर्मला सीतारमन यांनी मांडलेले अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाचे मुद्दे

निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आयकर भरायची गरज नसणार आहे. मात्र ही सुविधा नवीन करप्रणाली स्वीकारणाऱ्या करदात्यांना मिळणार आहे. जुन्या टॅक्स प्रणालीप्रमाणे अजूनही 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नात कारमध्ये सूट आहे.

टॅक्स स्लॅबमध्ये केले बदल

सरकारने नवीन टॅक्स प्रणालीनुसार इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही बदल केले आहेत. व्यक्तिगत आयकरचे नवीन टॅक्स दर आता 0 ते 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्नपर्यंत 0, 3 ते 6 लाख रुपयेपर्यंत 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपयेपर्यंत 10टक्के, 9 ते 12 लाखपर्यंत 15 टक्के, 12 ते 15 लाखपर्यंत 20टक्के आणि 15 लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे बजेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. रेल्वेसाठी केलेली ही आतपर्यंतची सर्वात मोठी आर्थिक तरतुद आहे, जी 2014 सालच्या तुलनेत नऊ पट आहे. म्हणून या घोषणेमुळे रेल्वेला अच्छे दिन येतील, असं बोललं जात आहे.

पुढील आर्थिक वर्षामध्ये GDP च्या 5.9 टक्के राहील वित्तीय तूट

निर्मला सीतारामन यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या दरम्यान देशाची वित्तीय तुटच्या जीडीपी 5.9 टक्के वर राहील, असा विश्वास दर्शवला आहे.

कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी 10 कोटींची तरतुद

सरकारने अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षासाठी कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी 10 लाख कोटींची तरतूदीची घोषणा केली आहे, जी मागच्या वर्षापेक्षा 33 टक्के अधिक आहे. यासह ही देशाच्या एकूण जीडीपीच्या 3.3 टक्के आहे. मागच्या वर्षी बजेटमध्ये यासाठी 7.5 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती.

Union Budget 2023 : मोदी सरकारची ‘सप्तर्षी’! सात गोष्टींवर देणार भर

वर्षात कॅपिटल एक्सपेंडिचरवर बजेट असा वाढला.

2020-2021 – 4.39 लाख कोटी

2021-2022 – 5.4 लाख कोटी

2022-2023 – 7.5 लाख कोटी

2023-2024 – 10 लाख कोटी

FY23 मध्ये जीडीपी ग्रोथ रेट 7 टक्क्यांवर राहण्याचा अनुमान

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान चालू आर्थिक वर्षात देशाची जीडीपी ग्रोथ रेट 7 टक्के राहील, असा अनुमान दर्शवला. त्या म्हणाल्या की हा रेट जगातील मोठ्या अर्थव्यावस्थेमध्ये सर्वाधिक आहे, कोरोनाचं आव्हान असताना सुद्धा. त्या म्हणाल्या भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने पुढे जात आहे. देश सुवर्ण भविष्याकडे जात आहे, असं त्या म्हणाल्या.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात 7 मुख्य प्राथमिकतांवर जोर दिला. त्यांनी या 7 प्राथमिकतांना सप्तर्षि असं नाव दिलं आणि म्हणाल्या अमृतकालमध्ये हे सप्तर्षि आपल्याला वाट दाखवतील, असं त्या म्हणाल्या.

या आहेत 7 प्राथमिकता

1. समावेशी विकास

2. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं

3. इंफ्रास्ट्रक्चर आणि गुंतवणूक

4. क्षमतेला उजागर करनं

5. हरित विकास

6. युवा शक्ती

7. फायनेंशिअल सेक्टर

महिला सन्मान बचतवर पत्र जारी करणार सरकार

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत पत्र जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा कालावधी दोन वर्षांचा असेल. याअंतर्गत महिला किंवा बालिकेच्या नावावर दोन वर्षांसाठी दोन लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.

    follow whatsapp