Turkey earthquake: तुर्की-सीरियात मृत्यूचं तांडव! 4000 अधिक लोकांचा मृत्यू

मुंबई तक

• 03:23 AM • 07 Feb 2023

Turkey and Syria earthquake latest news : तुर्की आणि सीरियावर नैसर्गिक संकटाने प्रचंड मोठा आघात केला. भूकंपाच्या तीन धक्क्यांनी दोन्ही देश हादरले. या भूकंपामुळे इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, तर हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागले. ताज्या माहितीप्रमाणे तुर्कीमध्ये 2,379 , तर सीरियामध्ये 1,440 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 11,000 अधिक लोक जखमी झाले असून, असंख्य […]

Mumbaitak
follow google news

Turkey and Syria earthquake latest news : तुर्की आणि सीरियावर नैसर्गिक संकटाने प्रचंड मोठा आघात केला. भूकंपाच्या तीन धक्क्यांनी दोन्ही देश हादरले. या भूकंपामुळे इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, तर हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागले. ताज्या माहितीप्रमाणे तुर्कीमध्ये 2,379 , तर सीरियामध्ये 1,440 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 11,000 अधिक लोक जखमी झाले असून, असंख्य लोक अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तुर्की आणि सीरियावर कोसळेल्या या नैसर्गिक आपत्तीनंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारतानेही एनडीआरएफची पथक मदत व बचावकार्यासाठी पाठवली आहेत.

हे वाचलं का?

तुर्कीमध्ये सगळे साखरझोपेत असताना मृत्यूने तांडव घातलं. पहाटे 4:17 वाजता भूकंपाच्या धक्क्यांनी देश हादरला. भूकंपाच्या तिसऱ्या धक्क्याची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल इतकी होती. 24 तासांत भूकंपाच्या तीन धक्क्यांनी तुर्की प्रचंड हाहाकार उडाला.

भूकंपामुळे 2,818 इमारती जमीनदोस्त झाल्या. उंच इमारती कोसळल्याने हजारो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. आतापर्यंत 2,470 लोकांना वाचवण्यात यश आलं असून, अजूनही हजारो लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. सध्या युद्ध पातळीवर मदत व बचाव कार्य सुरू आहे.

Turkey Earthquake: प्रलय आणि पुन्हा प्रलय… तब्बल 2000 जण मृत्यूमुखी

एपी वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (6 फेब्रुवारी) आलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर 12 तासांनी पुन्हा एक भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोगन यांनी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर तातडीची बैठक घेतली. ज्यात भूकंपग्रस्तासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तुर्कीतील भूकंपाचा केंद्र बिंदू कुठे होता?

तुर्कीत भूकंपाचा पहिला धक्का जाणवला सकाळी सवा चार वाजता. भूकंपाचे हादरे जाणवले ते गजियांटेप भागात. हा भाग सीरियाच्या सीमेला लागून आहे. सीरियाची सीमा येथून 90 किमी अंतरावर आहे. सीरियातही भूकंपामुळे भयावह स्थिती निर्माण झाली. सीरियातल्या अनेक शहरात भूकंपाचे हादरे जाणवले. सीरियात 1,440 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

भारताकडून मदतीचा हात

तुर्कीत झालेल्या भूकंपानंतर भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने एनडीआरएफच्या दोन तुकड्या पाठवल्या आहेत. त्याचबरोबर मदत साहित्य आणि डॉक्टरांचं पथकही पाठवलं आहे. भारतीय हवाई दलाच्या सी 17 विमानाने ही मदत पाठवण्यात आली.

खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे

तुर्कीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे मदत व बचाव कार्यात अडथळे येत आहे. खराब हवामानामुळे बचाव पथकांचे हेलिकॉप्टर उडान करू शकत नाहीये. अलिकडेच तुर्की आणि सीरियातील काही भागात बर्फवृष्टी झालेली आहे. त्यामुळे तापमानातही प्रचंड घट झाली आहे.

तुर्कीच्या मदतीसाठी जगभरातील देश सरसावले

तुर्की-सीरियात झालेल्या भूकंपानंतर जगभरातून मदतीसाठी देश पुढे आहेत. युनिसेफ तुर्की सरकारच्या संपर्कात असून, मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. दक्षिण कोरियाने सर्वोतोपरी मदत करण्याची हमी दिलीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांच्याशी चर्चा केली आणि मदतीसाठी तयार असल्याची हमी दिली. अमेरिकेने मदत कार्यासाठी पथक तैनात केली असून डॉक्टरांची पथकही पाठवली आहेत. रशियाने 300 सैनिकांच्या 10 बचाव पथकं सीरियात पाठवली आहेत.

    follow whatsapp