बैलगाडा शर्यतीवर आढळराव-वळसे पाटलांमध्ये टोलेबाजी, शर्यतीचं आयोजन करण्यावर आढळराव ठाम

मुंबई तक

• 01:19 PM • 21 Aug 2021

राज्यात बैलगाडा शर्यतीवर पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत पोलीस यंत्रणांना चकवत बैलगाडा शर्यत आयोजित केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत शर्यतीत आयोजित बैलगाडा मालकांवर कारवाई केली, परंतू आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एका कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लवकरच शर्यतबंदी विरोधात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचं […]

Mumbaitak
follow google news

राज्यात बैलगाडा शर्यतीवर पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत पोलीस यंत्रणांना चकवत बैलगाडा शर्यत आयोजित केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत शर्यतीत आयोजित बैलगाडा मालकांवर कारवाई केली, परंतू आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एका कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लवकरच शर्यतबंदी विरोधात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचं जाहीर केलं.

हे वाचलं का?

याच व्यासपीठावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही गृहमंत्र्यांच्या १५ दिवसांचा अल्टीमेटम देत त्यानंतर गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणार असल्याचं जाहीर केलंय.

Bullock Cart Race : आता बैलगाडा घेऊन मुंबईत जाणार; गोपीचंद पडळकर आक्रमक

बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात या निर्णयाविरोधात नाराजी होती. अनेकदा अनेक भागांत खुप्या पद्धतीने या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जायचं. परंतू काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर सांगलीत शर्यतीचं आयोजन करत पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांना आव्हान दिलं. हा प्रश्न नेमका कुठे अडकला आहे हे लोकांना सांगणं गरजेचं असल्याचं आवाहन वळसे पाटील यांनी केलं. आढळरावांनी दिलेल्या अल्टीमेटमला वळसे-पाटलांनीही उत्तर दिलंय.

बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेतले जाणार आहेत. परंतू पुढील काळात गुन्हे मागे घेणार म्हणून आताच कोणीही कायदा हातात घेऊ नका असं म्हणून वळसे पाटलांनी आढळरावांना टोला लगावला.

Bullock Cart Race: ‘बैलगाडा शर्यतीला तालिबानी नाही शेतकरी येणार आहेत’, MLC Padalkar यांना नोटीस

बैलगाडा शर्यतबंदीचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर आहे. केंद्र आणि राज्य सरकार बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी सकारात्मक आहे. परंतू जोपर्यंत या विषयात आंदोलन होणार नाही तोपर्यंत तोपर्यंत न्यायालय याची दखल घेणार नाही. पुढीलकाळात बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत आढळराव-पाटलांनी बोलताना व्यक्त केलं.

    follow whatsapp