“रोज कुरकुर आणि टूरटूर करणाऱ्यांबद्दल काय बोलायचं?”अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई तक

24 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:49 AM)

२१ सप्टेंबरच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरही टोला लगावला. होय तुमच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं. त्यानंतर आता याच बाबत मिसेस उपमुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांचं उत्तरही समोर आलं […]

Mumbaitak
follow google news

२१ सप्टेंबरच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरही टोला लगावला. होय तुमच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं. त्यानंतर आता याच बाबत मिसेस उपमुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांचं उत्तरही समोर आलं आहे.

हे वाचलं का?

अमृता फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

अमृता फडणवीस यांना नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले की ही शेवटची निवडणूक, त्यावर काय सांगाल? असं विचारलं गेलं. त्यावर त्या म्हणाल्या, “ते (उद्धव ठाकरे) काय रोजच कुरकुर आणि टूरटूर करतात. त्यांच्याबाबतीत काय बोलायचं? मी त्यांच्याबाबतीत काही बोलू शकत नाही.”

देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अमृता फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल की 2019 मध्ये सगळ्यांनी मला संपण्याचा प्रयत्न केला होता त्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं की “ते रोज पुन्हा येतात ..त्यांना कोणी मागे ढकलल तरी ते रोज पुढे येतात ते त्यांच्या व्यक्ती महत्त्वाची एक युएसपी आहे आणि ते पुन्हा चांगल्यासाठी येतात.”

शेवटची निवडणूक मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर आता देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय. अडीच वर्षांपूर्वी केलेल्या महाविकास आघाडीचा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंना उत्तर दिलंय.

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना काय उत्तर दिलं?

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरूदन होतं. त्यांना माझा सवाल आहे की, आम्ही तर लीगल निवडून आलो मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला, त्यावेळी का राजीनामे दिले नाही? त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत?”, असे प्रश्न फडणवीसांनी ठाकरेंना विचारलेत.

“तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत निवडून आला नव्हतात. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात. मोदीजींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले होतात. हिम्मत होती, तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की भाषण निराशेचं होतं”, असंही फडणवीस म्हणाले.

तुम्ही 2019 लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्ष मला संपण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकले नाहीत. यापुढे संपवू शकणार नाहीत”, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी ठाकरेंना दिलंय. तसंच या विषयावर आता अमृता फडणवीस यांनी उत्तर देऊन टाकलं आहे.

    follow whatsapp