राजकीय रणनीतीकार Prashant Kishor काँग्रेसमध्ये जाणार ?

मुंबई तक

• 02:02 PM • 29 Jul 2021

राजकीय रणनीतीकार प्रशांत काँग्रेसमध्ये जाणार का? या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. प्रशांत किशोर हे राजकारणातले रणनीतीकार मानले जातात. त्यांनी आता देशातला सगळ्यात जुना-जाणता पक्ष असलेल्या काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे का? या चर्चा सुरू झाल्या आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि प्रशांत किशोर यांची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत सोनिया गांधी […]

Mumbaitak
follow google news

राजकीय रणनीतीकार प्रशांत काँग्रेसमध्ये जाणार का? या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. प्रशांत किशोर हे राजकारणातले रणनीतीकार मानले जातात. त्यांनी आता देशातला सगळ्यात जुना-जाणता पक्ष असलेल्या काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे का? या चर्चा सुरू झाल्या आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि प्रशांत किशोर यांची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत सोनिया गांधी यादेखील व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभाग घेतला होता. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना कोणती जबाबदारी दिली जाईल? याचीही चर्चा रंगली आहे. राहुल गांधी यांनी एक बैठक घेऊन प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घ्यायचं काय याबाबत ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला मागितला आहे असंही कळतं आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसमध्येही दबक्या आवाजात ही चर्चा सुरू झाली आहे की प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो. मात्र याबाबत काँग्रेस काय किंवा प्रशांत किशोर काय कुणीही स्पष्ट काहीही सांगितलेलं नाही. एक आठवड्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांच्यामवेत कमलनाथ, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटनी, अजय माकन, आनंद शर्मा, हरिष रावत, अंबिका सोनी आणि के. सी. वेणुगोपाल यांनी या विषयावर चर्चा केली असं इंडिया टुडेने म्हटलं आहे.

काँग्रेसच्या सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे तपशील या ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं. या बैठकीला हजर असणाऱ्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडिया टुडेला ही माहिती दिली आहे की प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक असण्यापेक्षाही ते काँग्रेसचे सल्लागार म्हणून काम करू इच्छितात. बाहेरून ते पक्षासाठी सल्लागार म्हणून काम करतील.

विधानसभा निवडणूक : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काय दिला सल्ला?

विविध प्रकारच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर यांनी प्रवेश केला तर त्यांना कोणतं पद दिलं जाईल? आणि ते पक्षातल्या जुन्या खोडांना म्हणजेच पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांना पटेल का? हा प्रश्नही आहेच. काँग्रेस पक्षाला 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव स्वीकारावा लागला. अशात आता 2024 च्या निवडणुकीच्या आधी जर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर नक्कीच काँग्रेसला एका वेगळ्या उंचीवर ते नेऊ शकतात अशी शक्यता आहे. आत्तापर्यंत त्यांनी ज्या-ज्या पक्षांसोबत काम केलं त्यांना त्यांना त्यांच्या दृष्टीकोनातून नवी दिशा मिळाली आहे. आता नक्की प्रशांत किशोर काँग्रेसमधे जाणार की बाहेरून सल्लागार म्हणून काम करणार हे ठरायचं आहे. असं असलं तरीही सध्या राजकीय वर्तुळात प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये जाणार अशाच चर्चा रंगल्या आहेत.

    follow whatsapp