एकनाथ शिंदेंच्या बंडाने ठाकरेंना जबर झटका बसला. ४० चाळीस आमदार सोबत घेऊन शिंदेंनी सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यामुळे सातत्यानं हा प्रश्न चर्चिला जातो की शिंदेंच्या एव्हढ्या मोठ्या बंडाबद्दल ठाकरेंना काहीच कसं कळलं नाही? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनीच खुलासा केलाय. शिंदेंच्या बंडाबद्दल ठाकरेंना कुणकुण लागल्यानंतर काय घडलं, याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
