राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार मास्क घालण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीच कोरोनाचे नियम पायदळी तुडवले आहेत. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केले आहे.होळीचा सण सर्वत्र साजरा केला जातो आहे, यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवा सोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पोहोचले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
