राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राबद्दल कोणते प्रश्न उपस्थित होताहेत?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून, १७ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. एक दिवस आधीच मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा लटके निवडणूक लढत असून, त्यांना बिनविरोध निवडून दिल्यास ती श्रद्धांजली ठरेल, असं सांगत ठाकरेंनी […]

मुंबई तक

16 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

follow google news

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून, १७ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. एक दिवस आधीच मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा लटके निवडणूक लढत असून, त्यांना बिनविरोध निवडून दिल्यास ती श्रद्धांजली ठरेल, असं सांगत ठाकरेंनी फडणवीसांना भाजपनं निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली.

राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामुळे अंधेरी निवडणुकीला वेगळंच वळण लागलंय. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्राच्या टायमिंगबद्दल आता वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरूये. सोशल मीडियावर लोक या पत्राबद्दल व्यक्त होत असून, कोणते मुद्दे उपस्थित होत आहे, हे बघण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा…

    follow whatsapp