शिवसेना नेते और महायुतीचे जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या मध्ये जवळपास तासभर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. काही जुन्या गोष्टी मनाशी धरायच्या नाहीत, हे ठरवून खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या भेटीनंतर सांगितलं. त्यांनी असा एक नवीन संकल्प केला आणि आगामी निवडणुकीमध्ये आपला युती धर्म निभावणार असल्याचं भारत दिलं. या चर्चेनंतर जालनाच्या राजकीय वर्तुळात दोघांमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. दानवे यांनीही खोतकर यांच्या प्रचारासाठी काम करण्याचं आश्वासन दिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
