Nawab Malik यांना कोर्टाचा सवाल, वानखेडे प्रकरणात तुमच्याविरोधात कारवाई का नको?

मुंबई तक

07 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये? असा प्रश्न आज बॉम्बे हायकोर्टाने नवाब मलिक यांना विचारला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हा सवाल मलिक यांना विचारला आहे. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात पुन्हा एकदा हायकोर्टाचे […]

follow google news

न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये? असा प्रश्न आज बॉम्बे हायकोर्टाने नवाब मलिक यांना विचारला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हा सवाल मलिक यांना विचारला आहे. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरही नवाब मलिक आपल्या परिवाराची बदनामी करत असल्याचा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. याआधी झालेल्या सुनावणी नवाब मलिकांच्या वकिलांनी 9 डिसेंबरपर्यंत मलिक वानखेडे परिवाराबद्दल काहीही बोलणार नाहीत असं सांगितलं होतं.

    follow whatsapp