Solapur : महायुतीत 'खटके'! चंद्रकांत पाटलांसमोरच शिंदे-पवारांच्या नेत्यांचा पेटला वाद

सोलापुरातील जिल्हा नियोजन समीतीच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार यांच्यात वाद झाल्याने भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली.

मुंबई तक

04 Aug 2024 (अपडेटेड: 04 Aug 2024, 02:30 PM)

follow google news

Mahayuti : महायुतीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सर्व काही आलबेल असल्याचे दावे करत असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र, खटके उडताना दिसत आहेत. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला. अनगर येथे होणारे अप्पर तहसील कार्यालय हे सुविधायुक्त नसून, नागरिकांना अडचणीचे ठरणारे आहे, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी केला. त्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी एकेरी भाषा वापरली. यामुळे शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी तात्काळ प्रतिउत्तर दिले आणि दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हे सगळे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर घडले. 

    follow whatsapp