Eknath Shinde : मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं, धाराशीवमध्ये काय घडलं?

धाराशिवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोखत मराठा आरक्षणावर घोषणाबाजी केली. मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.

मुंबई तक

14 Sep 2024 (अपडेटेड: 14 Sep 2024, 09:02 PM)

follow google news

Eknath Shinde News : धाराशिवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोखत मराठा आरक्षणावरुन तुफान घोषणाबाजी करण्यात आली. धाराशिव शहरातील हातलाई मंगल कार्यालयाजवळ आंदोलकांनी या गोष्टीचा विरोध करत हैदराबाद गॅजेट लागू करण्यासह आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या सोबत चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आश्वासन दिलं की आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. आंदोलकांची मागणी होती की मराठा समाजाला न्याय मिळावा आणि त्वरित आरक्षण देण्यात यावे.

    follow whatsapp