Ravi Rana : अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना प्रमाणपत्र वाटप सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. त्यांनी मतदान न केल्यास पैसे परत घेऊ असे भाषणात म्हटले होते आणि यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर रवी राणा यांनी हे वक्तव्य गंमतीशीर असल्याचे सांगून सारवासारव केली, मात्र त्यांचे हे स्पष्टीकरण विरोधकांना मान्य झाले नाही. अशा प्रकारे वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वातावरण तापलेले दिसते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
