Shraddha Murder Case : डेटिंगमध्ये अडथळा ठरत असल्यानं आफताबनं श्रद्धाला संपवलं?

मुंबई तक

16 Nov 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांसमोर दररोज नवंनवे प्रश्न उभे राहत आहेत. आरोपी आफताब पूनावालानं श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आणि काही खुलासेही केलेत, पण हत्येचं नेमकं कारण काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या प्रश्नाचं उत्तर अजूनही पोलिसांनाही मिळालेलं नाही, पण काही धागे पोलिसांच्या हाती तपासातून लागलेत. त्यामुळेच श्रद्धाशिवाय आफताबच्या आयुष्यात इतर महिला होत्या का? […]

follow google news

श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आफताब पूनावाला दररोज नवंनवे खुलासे करत आहे. आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची १८ मे २०२२ रोजी हत्या केली. ती मेल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नवं फ्रिज विकत घेऊन त्यात ते ठेवले.

हे वाचलं का?

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरातल्या फ्रिजमध्ये ठेवलेले असताना आफताब डेटिंग करत होता. इतकंच नाही, तर त्याने डेटिंग करत असलेल्या महिलेला घरीही आणलं होतं, अशी माहिती समोर आलीये. ही महिला जून- जुलै मध्ये आफताबच्या फ्लॅटवर आली होती. त्यावेळी फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते. महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आणखी काही महिलांना डेट केल्याचंही समोर आलंय.

Shraddha Murder Case : “श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो” ऐकून पोलिसही हादरले

या महिला आफताबच्या घरी येऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच माहितीच्या आधारे आफताबच्या घरी येऊन गेलेल्या महिला कोण होत्या आणि आफताबबरोबर त्यांचे संबंध होते काय आहेत याची माहिती आता पोलीस गोळा करताहेत. त्यासाठी बम्बल डेटिंग अपची मदत पोलीस घेताहेत.

बम्बल डेटिंग अपच्या माध्यमातून आफताबच्या संपर्कात आलेल्या महिलांबद्दलची माहितीचा पोलीस शोध घेत आहेत. यापैकीच एखाद्या महिलेबरोबरच्या संबंधांमुळेच आफताब आणि श्रद्धाच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नात्यात खडा पडला का? आणि त्यातूनच श्रद्धाची हत्या झाली का याचा तपास पोलीस करताहेत.

Shraddha Murder: एक होती श्रद्धा वालकर! प्रेमाच्या ३५ तुकड्यांची आक्रंदणारी कहाणी

‘श्रद्धाला आफताबने इतर महिलांशी बोललेलं आवडायचं नाही’ अशी माहिती स्वतः आफताबने पोलिसांना दिलीये. त्यामुळे याच मुद्द्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते का? आफताबचे इतर महिलांशी संबंध होते का? या अनुषंगानेही पोलीस तपास करताहेत.

    follow whatsapp