एकनाथ शिंदेसोंबत वाद झाल्याचं वृत्त, प्रताप सरनाईक ‘मुंबई Tak’शी बोलताना काय म्हणाले?
“कोण अशा बातम्या पेरतंय, याची मला काही कल्पना नाही. योगायोगाने मी आणि मुख्यमंत्री साहेब एकत्रच आहोत. गेली २५ वर्ष आम्ही (प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे) मित्र म्हणून काम करतोय. आता ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत. परंतु महापालिकेत नगरसेवक पदापासून आम्ही गेली अनेक वर्ष एकत्र आहोत. आजच माझ्या मुलाने ट्विट केलंय की, दो जिस्म एक जान है हम. त्यामुळे गेले २५ ते २७ वर्षात जे झालं नाही, ते आता कशाला होईल. आतातर ठाणेकरांसाठी आनंदाचे दिवस सुरू आहेत. ठाण्याचा मुख्यमंत्री आहे”, असं सरनाईक यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
पुढे बोलताना प्रताप सरनाईक असंही म्हणाले की, “मतदारसंघाबद्दलही काही प्रश्न नाहीत. आमची युती आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ त्याला सोडायचा. दोन वर्ष विधानसभा निवडणुकीला बाकी आहेत. त्या दरम्यान ही चर्चा निरर्थक आहे. कुणीतरी काहीतरी बातम्या सोडतं आणि कशाही पद्धतीच्या बातम्या प्रसारित केल्या जात असतील, तर ते चुकीचं आहे”, अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी शिंदेंसोबतच्या वादाच्या वृत्तावर मांडलीये.
ADVERTISEMENT
