एकनाथ शिंदे यांच्या प्रेझेंटेशनला अमित शहा यांची पसंती?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर जागावाटपावर प्रेझेंटेशन दिले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई तक

12 Sep 2024 (अपडेटेड: 12 Sep 2024, 08:36 AM)

follow google news

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर शिंदेंनी लोकसभेतील परफॉर्मन्सचा आधार घेत जागावाटपावर प्रेझेंटेशन दिलंय. त्यामुळं आता एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव अमित शहा मान्य करतील का? यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या प्रेझेंटेशनमध्ये शिंदेंनी त्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे आणि निवडणुकीसाठी महायुतीच्या रणनितीची रूपरेषा मांडली आहे. निवडणुकीतील यशस्वितेसाठी एकनाथ शिंदे यांचा हा प्रस्ताव महत्त्वाचा असणार आहे असे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

    follow whatsapp