Bhagat Singh Koshyari : राज्यपालपद सोडल्यानंतर कोश्यारींची स्फोटक मुलाखत

मुंबई तक

19 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 06:01 PM)

Bhagat Singh Koshyari interview : भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याचीआधीच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा (Governor Of Maharashtra) राजीनामा दिला. भगतसिंह कोश्यारींची राज्यपालपदाची कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली आणि राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी राहिली. कोश्यारी यांचा सव्वातीन वर्षांपैकी अडीच वर्षांचा कार्यकाळ हा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) सरकारसोबत गेला. या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

follow google news

Bhagat Singh Koshyari interview : भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याचीआधीच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा (Governor Of Maharashtra) राजीनामा दिला. भगतसिंह कोश्यारींची राज्यपालपदाची कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली आणि राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी राहिली. कोश्यारी यांचा सव्वातीन वर्षांपैकी अडीच वर्षांचा कार्यकाळ हा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) सरकारसोबत गेला. या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत भगतसिंह कोश्यारींचे वेळोवेळी खटके उडाले. त्यातून मविआ सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीत युद्धही दिसून आलं. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत कोश्यारींचे सलोख्याचे संबंध दिसायचे. याचं सगळ्या घडामोडींवर भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल स्फोटक विधानं, खळबळजनक दावे, खुलासे केले आहेत.

हे वाचलं का?
    follow whatsapp