गणेशोत्सव 2024: खेतवाडीत उभारली अयोध्या, गणपती मंडळात बाप्पा विराजमान

मुंबईतील गणेशोत्सवात खेतवाडीत यावर्षी 12व्या क्रॉस लेनमध्ये अयोध्या राम मंदिराचे देखावे उभारले आहेत.

मुंबई तक

11 Sep 2024 (अपडेटेड: 11 Sep 2024, 08:06 AM)

follow google news

मुंबईतील गणेशोत्सव इथल्या भव्य मूर्तीसाठी ओळखला जातो. विविध ठिकाणांहून लोक बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येतात. मुंबईतील खेतवाडीत एकूण 12 गल्ल्यांमध्ये 12 मंडळ गणपती बसवतात. त्यातलाच 12व्या क्रॉस लेनचा हा गणपती एका अनोख्या देखाव्यात बघायला मिळतो. Ayodhya Ram Mandir चा सुंदर देखावा उभारण्यात आला आहे. Mumbai मधल्या Khetwadi इथला देखावा बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. मुंबईतील खेतवाडी या जागेतील 12 गल्ल्या या खास गणपतीच्या उत्सवासाठी ओळखल्या जातात. दरवर्षी इथे अनोखे देखावे उभारले जातात. 12व्या क्रॉस लेनमधील गणपतीने यावर्षी अयोध्याच्या राम मंदिराचा देखावा उभारला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले भक्तगण या देखाव्याला अतिशय आवडीने बघत आहेत. मुंबईतील गणेशोत्सव हा केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक महत्त्वही जपतो. त्यामुळे दरवर्षी ह्या उत्सवाची लोक आतुरतेने वाट बघत असतात. खेतवाडी ही जागा सुंदर देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि यावर्षीचा देखावा अयोध्याच्या राम मंदिराच्या अनुषंगाने सजवला आहे. हा देखावा बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.

    follow whatsapp