बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन

मुंबई तक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं. ते शंभर वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ गाव हे पुण्याजवळील सासवड. २९ जुलै १९२२ ला जन्मलेल्या पुरंदरे यांनी यंदाच आपला शंभरावा वाढदिवस साजरा झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक होती. दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील […]

मुंबई तक

15 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:31 PM)

follow google news

मुंबई तक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं. ते शंभर वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ गाव हे पुण्याजवळील सासवड. २९ जुलै १९२२ ला जन्मलेल्या पुरंदरे यांनी यंदाच आपला शंभरावा वाढदिवस साजरा झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक होती. दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. निष्णात डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण वयोमानानुसार त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचं सांगण्यात आलं.

    follow whatsapp