योगी-ममतांच्या रेसमध्ये लोकप्रियतेत उद्धव ठाकरे कितव्या स्थानी? ठाकरेंची लोकप्रियता वाढली की घटली?

गेल्या वर्षभरात कोरोनाची लाट दोनदा येऊन गेली, मिनी लॉकडाऊनसारख्या स्थितीमुळे अर्थचक्र बिघडलं, वादळं आली, शेतकरी आंदोलनं झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन गेल्या आणि अगदी तोंडावर तर महाराष्ट्रातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आल्याही आहेत. या सगळ्यात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे प्रयत्न तर सुरूच होते, कधी राज्यपालांसोबतचा वाद, कधी आमदारांच्या निलंबनाचा वाद, तरी कधी केंद्राकडून मिळणाऱ्या […]

मुंबई तक

20 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)

follow google news

गेल्या वर्षभरात कोरोनाची लाट दोनदा येऊन गेली, मिनी लॉकडाऊनसारख्या स्थितीमुळे अर्थचक्र बिघडलं, वादळं आली, शेतकरी आंदोलनं झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन गेल्या आणि अगदी तोंडावर तर महाराष्ट्रातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आल्याही आहेत. या सगळ्यात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे प्रयत्न तर सुरूच होते, कधी राज्यपालांसोबतचा वाद, कधी आमदारांच्या निलंबनाचा वाद, तरी कधी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीच्या वादावरूनही केंद्र सरकार vs राज्य सरकार वादाच्या ठिणग्या पडल्या. मेट्रो-आरक्षणासारखे वाद तर सुप्रीम कोर्टापर्यंतही गेले. या सगळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेत घट झाली का? देशातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्या स्थानी आहेत? उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर महाराष्ट्राची जनता किती खूश आहे किती नाखूश याचाच मूड आम्ही जाणून घेतलाय. इंडिया टूडेच्या मूड ऑफ द नेशन 2022 च्या पोलमध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान कुठे? पाहूयात

    follow whatsapp