PMC बँक खातेदारांना कसे मिळणार पैसे परत? RBI चा काय आहे नवा प्लॅन?

आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी अर्थात पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव बॅंकेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमसी बँकेचं यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ड्राफ्ट स्कीम जाहीर केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ड्राफ्ट स्कीमप्रमाणे पीएमसी बँकेची संपत्ती आणि दायित्व पूर्णपणे यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेचं असणार […]

मुंबई तक

23 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:30 PM)

follow google news

आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी अर्थात पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव बॅंकेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमसी बँकेचं यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ड्राफ्ट स्कीम जाहीर केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ड्राफ्ट स्कीमप्रमाणे पीएमसी बँकेची संपत्ती आणि दायित्व पूर्णपणे यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेचं असणार आहे. यात पीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणून या अटींचा समावेश विलिनीकरण करारात करण्यात आलेला आहे.

    follow whatsapp