महायुतीला लाडक्या बहिणींचा कौल मिळणार का?

महायुतीची लाडकी बहीण योजना विधानसभेत यशस्वी ठरणार का? पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये देणारी योजना महाराष्ट्रात चर्चेत.

मुंबई तक

10 Sep 2024 (अपडेटेड: 10 Sep 2024, 06:51 PM)

follow google news

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळपास निश्चित झाल्या आहेत. लोकसभेमध्ये महायुतीवर अपरिहार्य यश आले नाही. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली गेली. पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये देणारी ही योजना महाराष्ट्रात चांगलीच चर्चेत आली आहे. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेत फायदा होणार का? लाडक्या बहिणींनी महायुतीला कौल देणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

    follow whatsapp