राजाराम कारखान्याची निवडणूक कोल्हापूरसाठी महत्त्वाची काय?

मुंबई तक

08 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:56 PM)

Satej Patil – Mahadik Family यांच्यासाठी राजाराम कारखाना निवडणूक एवढी महत्त्वाची का? | Kolhpur News

follow google news

कोल्हापूर म्हटलं की तांबडा-पांढरा रस्सा आपल्या नजरेसमोर येतो. अगदी तसंच कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की बंटी पाटील आणि महाडिक कुटुंबातला संघर्ष समोर येतो. कोल्हापूरचं राजकारण सहकाराभोवती फिरतं. आणि याच सहकारामुळे या संघर्षाला नवी धार चढलीय. महाडिक कुटुंबाच्या हातातलं शेवटचं सत्ताकेंद्र मिळवण्यासाठी बंटी पाटलांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत. पण त्याआधीच त्यांना दोन झटके बसलेत. तर आपली २५ वर्षांची सत्ता अबाधित राखण्यासाठी महाडिकांची तिसरी पिढी आखाड्यात उतरलीय. अवघे तेरा हजार मतदार असलेली राजाराम कारखान्याची निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे, असं का म्हटलं जातंय. आणि या निवडणुकीत कोणाचं पारडं किती जड आहे, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Importance of rajaram sakhar karkhana election for kolhapur politics

    follow whatsapp