Mumbai Crime News : कुर्ला खून, बलात्कार प्रकरणात आतापर्यंत काय सापडलं?

मुंबईत काही दिवसांपूर्वीच शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच दरम्यान शहरात आणखी एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. मुंबईच्या कुर्ला भागातील एका इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आल्याचं समजतंय. कुर्ला भागातील HDIL कंपाऊंड भागातील एका इमारतीच्या टेरेसवर […]

मुंबई तक

29 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:29 PM)

follow google news

मुंबईत काही दिवसांपूर्वीच शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच दरम्यान शहरात आणखी एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. मुंबईच्या कुर्ला भागातील एका इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आल्याचं समजतंय. कुर्ला भागातील HDIL कंपाऊंड भागातील एका इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार घडला आहे. विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. कुर्ला बलात्कार आणि खून प्रकरणाची सारी हकीकत पोलिसांनी पोलिसांनी सांगितली. पीडित मुलीची ओळख कशी पटवली, कसा केला उलगडा?

    follow whatsapp