महायुतीच्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ३३ विद्यमान आमदार, ९ नवीन चेहर्यांचा समावेश असून ३ अपक्ष आमदारांचीही घोषणा करण्यात आली आहे. या उमेदवार निवडीत मुख्यत: विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले आहे त्यामुळे या निर्णयाने अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, मागील निवडणुकीत भाजपच्या ताब्यात असलेल्या तीन जागा शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या निर्णयामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांवर शिवसेनेचे वाढते वर्चस्व दिसून येत आहे. या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्या वळणावर नेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
