मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले होते. भाषणाच्या शेवटी संत तुकोबारायांचा अभंग त्यांनी सभागृहात सादर केला. ‘येथे पाहिजे जातीचे, येऱ्यागबाळ्याचे काम नाही’, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणाही साधला. आज विधानसभेत उद्धव ठाकरे आणि अजित पवार राज्यपलांच्या अभिभाषणावर बोलणार आहेत. यावेळी ते विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांवर काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
