वडीगोद्रीत तणाव वाढला, मराठा-ओबीसी आंदोलकांमध्ये खलबतं, समन्वय बैठकीत काय घडलं?

वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी आंदोलकांसोबत जिल्हा पोलीस प्रशासनाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याच आश्वासन दिलं.

मुंबई तक

22 Sep 2024 (अपडेटेड: 22 Sep 2024, 08:35 AM)

follow google news

Maratha Reservation Issue : मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाची मराठा आणि ओबीसी आंदोलकांसोबत समन्वय बैठक संपन्न झालीय. वडीगोद्री येथे ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांची जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक पार पडलीय. या बैठकीत दोन्ही समाजाच्या आंदोलकांनी आपल्या भूमिका मांडत पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याच आश्वासन दिलं. ओबीसी आणि मराठा आंदोलकांचा वडीगोद्रीत झालेल्या संघर्षामुळे पोलीस अधीक्षकांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला असून उद्या पोलिस बंदोबस्तात वाढ केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिलीय.

    follow whatsapp