मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एकेरी भाषेत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. या आरोपांमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात. 2013 मध्ये पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केल्याने कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या अडचणी खूप वाढण्याची शक्यता आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षण मुद्दा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
