राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटू न दिल्याने आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांना संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हैदराबाद गॅजेट इयर लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मागणीचं निवेदन सोबत आणत राज्यपालांना भेटू देण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. पण हे प्रोटोकॉलमध्ये नसल्याने त्यांना भेटता येणार नाही असं सांगण्यात आलं, त्यामुळे आंदोलकांनी सुभेदारीच्या गेस्ट हाऊससमोर घोषणा दिल्या. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
