मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. धुळ्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. जयंत पाटील यांच्या शिवसंवाद यात्रेनिमित्त धुळ्यात आलेल्या पाटील यांना मराठा समाजाचे कार्यकर्ते शिवतीर्थ चौकात घेराव घालून निदर्शने केली. 'आरक्षण आमच्या हक्काचा आहे नाही कुणाच्या बापाचं' अशा घोषणाबाजी करून मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. यावेळी जयंत पाटील यांनी मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले व ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
