भारत गणेशपुरे,संदीप पाठक म्हणतात बोलीभाषेत एकप्रकारचा गोडवा

महाराष्ट्रात मैला मैलावर वेगवेगळी भाषा बोलली जाते. या भाषेचा एक वेगळाच गोडवा असतो. रंगभूमीवर,सिनेमात, मालिकांमध्ये मराठीतील या बोलीभाषांमध्ये बोलणारे कलाकार आणि त्यांची भाषा याबद्दल सध्या बरंच कुतुहल आहे. मालवणी,वऱ्हाडी,नागपूरी भाषा आत्ता लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात सुप्रसिध्द झाल्या आहेत. मात्र या कलाकारांनी आपल्या करिअरची सुरवात केली तेव्हा या कलाकारांना आपल्या गावची भाषा प्रमाण भाषेबरोबर रूजवण्यासाठी अनेक अडचणींना […]

मुंबई तक

27 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

follow google news

महाराष्ट्रात मैला मैलावर वेगवेगळी भाषा बोलली जाते. या भाषेचा एक वेगळाच गोडवा असतो. रंगभूमीवर,सिनेमात, मालिकांमध्ये मराठीतील या बोलीभाषांमध्ये बोलणारे कलाकार आणि त्यांची भाषा याबद्दल सध्या बरंच कुतुहल आहे. मालवणी,वऱ्हाडी,नागपूरी भाषा आत्ता लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात सुप्रसिध्द झाल्या आहेत. मात्र या कलाकारांनी आपल्या करिअरची सुरवात केली तेव्हा या कलाकारांना आपल्या गावची भाषा प्रमाण भाषेबरोबर रूजवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अश्यातीलच अभिनेता भारत गणेशपुरे,संदीप पाठक आणि प्रल्हाद कुडतरकर यांच्याशी मुंबई तकने मराठीतील बोलीभाषांबाबत विशेष संवाद साधला

    follow whatsapp