Video : दिघे साहेबांच्या आश्रमात शिंदेंच्या सेनेने नोटा उधळल्या, 'पावित्र्य नष्ट केल्याची' ठाकरे गटाची टीका

ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटा उधळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

मुंबई तक

14 Sep 2024 (अपडेटेड: 14 Sep 2024, 02:52 PM)

follow google news

Anand Ashram Video : ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटा उधळण्याच्या प्रकारामुळे बरेच वाद निर्माण झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हिडिओ शेअर करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे आनंदाश्रमात वातावरण तापले असून, स्थानिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

ठाण्यातील या घटनेवर नवी मुंबईच्या नरेश म्हस्के यांनी देखील टीका केली आहे. या दोघांमध्ये वाद विकोपाला जात असल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. परंतु या घटनेमुळे स्थानिक राजकारणात एक वादळ उठले आहे. या समोर आलेल्या व्हिडीओने ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतलं असून, या प्रकाराविषयी तपास सुरू आहे.

    follow whatsapp