MSRTC Viral Video : एसटी बसची दुरावस्था की प्रवाशांचे स्टंट? हे दोन व्हिडीओ पाहाच

लालपरीचे अत्यंत वाईट स्थितीचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. प्रवाशांनी जीवघेणे स्टंट करु नयेत असे सांगण्यात येत आहे.

मुंबई तक

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 02:12 PM)

follow google news

महाराष्ट्रात लालपरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक भागात प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावं लागतं. तीही वेळेवर न आल्याने या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. आता हे दोन व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसटीच्या दुरावस्थेचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. प्रवाशांनी जीवघेणे स्टंट करु नये हे एकीकडे बोललं जात असताना लालपरीच्या दुरावस्थेबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत.

    follow whatsapp