Mumbai Police: अंगझडतीच्या नावाखाली तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज; CCTVमुळे पोलिसांचे फुटले बिंग

मुंबईत पोलिसांनी ड्रग्जची पुडी तरुणाच्या खिशात टाकून फसवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबई तक

01 Sep 2024 (अपडेटेड: 01 Sep 2024, 09:49 PM)

follow google news

Mumbai Police : या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की अंगझडतीच्या नावाखाली पोलिस कर्मचारी या व्यक्तीच्या खिशात हळूच ड्र्ग्जची पुडी टाकत आहेत. मुंबईत घडलेला हा प्रकार असून हे कृत्य केल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. ह्या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहरातील नागरिकांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले आहेत.

पोलिसांच्या या कृतीमुळे मुंबई पोलिसांचा विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित झाली आहे. पोलिसांनी केलेल्या या प्रकारामुळे लोकांमध्ये संताप वाढला असून या प्रकरणाचा योग्य तीच चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

    follow whatsapp